जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणिकंद पोलिस स्टेशन आवारात वृक्षारोपण

वाघोली- झाडांची खुप आवड असणारे लोणिकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप माणकर हे ज्याठिकाणी काम करतात त्याठिकाणी झाडे लावतातच त्याचप्रमाणे त्यांनी काल पोलिस स्टेशन आवारात वड,पिंपळ अशा देशी झाडा़ची लागवड करण्यात आले. यापुढे वाघोली,केसनंद,वाढेबोल्हाई याठिकाणी पोलिस चौक्या होणार आहेत .त्याठिकाणी देशी झाडे लावणार असल्याचे पोलीस निरीक्षक माणकर साहेब यांनी सांगितले तसेच बकोरीचे डोंगरावर सर्व पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांचेसमेवत 100 देशी झाडे लावण्याचे आश्वासन माणकर साहेब यांनी दिले.

सदर वृक्षरोपण कार्यक्रमासाठी पोलिस निरीक्षक माणकर साहेब,पोलीस हवालदार श्री बेंद्रे साहेब , पोलीस कर्मचारी ,माहिती सेवा समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत वारघडे हे उपस्थित होते.

Previous articleपुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवराज्याभिषेक दिन साजरा
Next articleशिवसैनिकांनी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती करावी – रमेश कोंडे