Tuesday, October 27, 2020
Home Blog

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी- शिवशंभु छावा प्रतिष्ठान ची मागणी

राजगुरूनगर-गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या शेती पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूर्ण शेतातील पिके वाया गेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शिवशंभु छावा प्रतिष्ठान खेड तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना दिले आहे.

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकाला नुकसान भरपाई मिळणार असल्याचे जाहीर केले असून हे नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी व त्याबाबतच्या सूचना तालुकास्तरावर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना द्याव्यात त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले आहे.

विक्रीसाठी आणलेला २८ किलो गांजा जप्त, दोघांना अटक

अमोल भोसले,उरुळी कांचन –

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडून अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या सरावलेल्या २ आरोपींना अटक त्यांच्या सुमारे 4 लाख 20 हजार रु किमतीचा 28 किलो गांजा तसेच एक चारचाकी कार असा एकूण 8 लाख 20 हजार रुपये चा माल जप्त करण्यात आला. आज (दि. २७ )रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख याजकडून अवैध धंदे यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते .

वरील आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते .

या पथकास गोपनीय बातमी दारा मार्फत एक गाडी नं एम एच १२ क्यू ए ४४७९ पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये अवैध रित्या गांजा वाहतूक होणार असल्याचे सांगितले सदर बातमीची खात्री करुन थेऊर ते नायगाव पेठ मार्गे उरुळी कांचन रेल्वे लाईन पलीकडे रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला बातमीदार यांनी संगितले प्रमाणे वरील नंबरची पांढऱ्या रंगाची कार आलेवर सदर पथकाने गाडी ताब्यात घेतली असता सदर गाडीत 2 इसम मिळून आले सदरच्या गाडीत मागच्या डिकी मध्ये पांढऱ्या रंगाचे पोते मिळून आले पोत्यात असलेला पदार्थ गांजा असलेची खात्री झालेवर सदरचे 2 इसम यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव तानाजी शंकर डुकळे (वय २९ वर्षे ,रा कोलवडी माळवाडी(ता. हवेली) , शिवाजी शंकर डुकळे (वय ३२  रा.कोलवडी माळवाडी.ता. हवेली) यांना ताब्यात घेतले असता सदरचा गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले सदरच्या आरोपीकडून खलील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत ४ लाख 20 हजार किंमतीचा 28 किलो गांजा ,एक पांढऱ्या रंगाची मारुती सुजूकी कंपनीची चार लाखाची स्विफ्ट डिझायर असा एकूण ८ लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन इन डी पी एस ऍक्ट कलम ८(क) २० (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपास कामी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे .

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट तसेच पो.उप निरीक्षक शिवाजी ननावरे , सहा पो फो दत्तात्रय गिरमकर, पो हवा राजेंद्र पुणेकर, पो हवा उमाकांत कुंजीर , पो हवा महेश गायकवाड, पो हवा निलेश कदम, पो ना विजय कांचन, पो ना जनार्दन शेळके, पो.ना राजू मोमिन ,पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे .

कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी सुरेश कुंभार

दिनेश पवार,दौंड

कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य च्या दौंड तालुकाध्यक्ष पदी देऊळगाव राजे चे माजी सरपंच सुरेश मारुती कुंभार यांची निवड करण्यात आली,संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोमवंशी,कार्याध्यक्ष-हेमंत खटावकर यांनी सुरेश कुंभार यांना निवडीचे पत्र दिले,या निवड झाल्याच्या निमित्ताने माजी आमदार रमेश आप्पा थोरात,पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या हस्ते देऊळगाव राजे या ठिकाणी सुरेश कुंभार यांचा सन्मान करण्यात आला.

सुरेशकुंभार हे वृक्ष संवर्धन समीतीचे सदस्य,ग्राहक संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य चे सदस्य आहेत, त्यांचे सामाजिक कार्य पाहून ही निवड करण्यात आली आहे,युवकांच्या कौशल्य आधारित उपक्रम,कुंभार समाजाला व्यवसाय निर्मिती करण्यासाठी तसेच या व्यवसायातील असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुरेश कुंभार यांनी सांगितले

जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनेश पवार,दौंड

प्रहार जनशक्ती पक्ष व महाराष्ट्र राज्य दारू बंदी समिती आयोजित जेष्ठ नागरिकांसाठी आळंदी म्हातोबाची तालुका हवेली येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व उपचार शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, या शिबिरात एकूण चारशे च्या वर जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला तर यातील 40 जणांची शस्त्रक्रिया साठी नोंद करण्यात आली .

तपासण्या मधून लासुर,मोतीबिंदू व इतर आजारांची तपासणी करण्यात आली या शिबिराचे उदघाटन लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर,व राजाभाऊ तांबे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महराष्ट्र राज्य दारूबंदी चे मंगेश फडके,हवेली अध्यक्ष सारीकाताई जवळकर,प्रहार जनशक्ती पक्ष हवेलीअध्यक्ष प्रज्वल जवळकर ग्रामसेवक पी.एस.पवार, प्रहार जिल्हा संघटक नीरज कडू सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते

ऊस तोड कामगारांची नोंदणी करुन महामंडळाचे कामकाज पुर्ण क्षमतेने सूरू करण्याचे खासदार शरद पवार यांचे निर्देश

अमोल भोसले,उरुळी कांचन

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली.

आज राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने महामंडळाला बळकटी देण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपायोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ,सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर संघाचे संजय खताळ, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह राज्यातील विविध ऊस तोड संघटनांचे प्रतिनिधी राज्य सहकारी महासंघाचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे अनेक प्रलंबित असलेले प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून कशापद्धतीने मार्गी लावता येतील यासंदर्भात सविस्तर सादरीकरण सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आले.

ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महामंडळाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच महामंडळाला स्वायत्त व सक्षम बनवण्यासाठी करण्यात येणारी नियमावली याबाबतची सविस्तर माहिती यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

महामंडळाचे प्रादेशिक स्तरावर कार्यालय, कंपनी कायद्याअंतर्गत नियमावली बनवणे, ऊसतोड कामगार, पशु, वाहने आदींची नोंदणी करून ओळखपत्र देणे, नवीन पदांना मंजुरी देणे, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थसहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, ऊसतोड कामगार महिलांसाठी आरोग्याच्या विविध योजना, त्याचप्रमाणे ऊसतोड कामगार यांच्यासाठी विमा योजना यासह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी शरद पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. शिवाय
महामंडळाला देण्यात येणाऱ्या बळकटीबाबत सामाजिक न्याय विभागाच्या कार्याचे समाधान व्यक्त केले तसेच महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे जास्तीत जास्त प्रश्न समस्या सोडवण्यासाठी नोव्हेंबरअखेर महामंडळाची नोंदणी करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पुर्ण क्षमतेने सूरू करण्याचे निर्देश खासदार शरद पवार यांनी यावेळी दिले.

सुरेश भालेराव यांची शिव छावा संघटनेच्या वसमत तालुका अध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिव छावा संघटनेच्या वसमत तालुका अध्यक्ष पदी सुरेश रामराम भालेराव पाटील यांची निवड करण्यात आली. शिव छावा संघटना संस्थापक अध्यक्षा संगीता मुरकुटे, केंद्रीय अध्यक्ष कीरण पिंगळे पाटील व महासचिव लव शिवाजीराव डमरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निवड करण्यात आली आहे.

मराठवाडा विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, मराठवाडा उपाध्यक्ष संतोष धांडे , पवन जाधव, आय टी प्रदेशाध्यक्ष हनुमान वर्हाडे , सागर नवले कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष , कल्याणदास वैष्णव कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख भागवत सोळूंके, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष जितेंद्र पाटील, महाराष्ट्र उपसंपर्कप्रमुख सागर भोसले, नाशिक जिल्हाध्यक्ष स्वप्निल मोरे, शेतकरी आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष मंगेश जाधव, सचिन तिडके नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष , रविंद्र आहीरे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष , नाशिक कार्याध्यक्ष हर्षद मोरे , बुलढाणा जिल्हाध्यक्ष शुभम ढवळे , प्रविण पाटील मालेगाव तालुकाध्यक्ष, व जित चिकणे नाशिक ग्रामीण जिल्हा संघटक, ज्ञानेश्वर देवरे देवळा तालुकाध्यक्ष, सोमनाथ माळी सोलापूर जिल्हाध्यक्ष, कैलास राजपूत नंदूरबार जिल्हाध्यक्ष , अमर शिंदे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष , श्रीकांत माळी सोलापूर उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष दीनेश माळी , जालना जिल्हाध्यक्ष संदीप चिंचोले, भागवत शिंदे जालना शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष, विनोद पुरकर नाशिक आय टी जिल्हाध्यक्ष, ग्रामीण नाशिक महीला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री जांभळे, संतोष आहीरे, अक्षय दींडे जेलरोड विभाग प्रमुख, कीरण देशमुख नाशिक शहर अध्यक्ष , संदीप राऊत वाशिम जिल्हाध्यक्ष , संजय राजपूत अहमदाबाद जिल्हाध्यक्ष, सोमनाथ मुंगसै महाराष्ट्र राज्य चिटणीस, व शिव छावा संघटना महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी बंधू भगिनी यांच्याकडून नुतन तालुका अध्यक्ष सुरेश भालेराव यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव झाला.

कोरोना कवच विम्याचे’ मुळशीतील पत्रकारांना वाटप

 पौड-कोरोनाच्या संकटात आपल्या लेखनीने समाजात कोरोनासह इतर माहिती पत्रकार बांधवांनी इत्थंभूतपणे समाजात पोहोचवली व पोहोचवत आहेत. त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता पत्रकार काम करत आहेत. इतर (डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, विविध शासकीय कर्मचारी) कोरोना योद्ध्यांसारखा मान व सन्मान पत्रकारांच्या नशिबी मात्र आला नाही. सरकारकडूनही पत्रकारांसाठी विशेष काही केले गेले नाही. साधा विमादेखील पत्रकारांना लागू करण्याचे औदार्य दाखवले गेले नाही. पत्रकार हा कायम दुर्लक्षित आणि तसा इतर घटकांच्या तुलनेत आजपर्यंत वंचितच राहिला आहे. कोरोना महामारीही याला अपवाद ठरली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

           पुण्यासारख्या प्रगत शहरातले मुख्य प्रवाहातील पत्रकार पांडूरंग रायकर यांना व्हेंटिलेटर वेळेत न मिळाल्याने झालेला मृत्यू पत्रकारितेची अब्रु घालवणारा तर सरकारी व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारा ठरला. मुख्य प्रवाहातील पत्रकारांची ही दुर्दशा, तर ग्रामीण भागातील पत्रकारांची काय दशा असेल याचा विचार न केलेलाच बरा. मात्र रायकरांच्या दुःखद निधनानंतरही पत्रकारांसाठी कोणतेही ठोस पाऊल न उचलणारे शासन पाहता पत्रकारांनाच पत्रकारांसाठी धावपळ व प्रयत्न यापुढे करावे लागणार आहेत. असाच एक छोटासा आणि आदर्श प्रयोग पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातील पत्रकारांनी केला आहे. तालुक्यातील पत्रकारांसाठी दोन लाखाच्या कोरोना कवच विम्याचा लाभ देऊन एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. पत्रकारांना यासाठी हिंजवडी आयटी सिटीतील डी.बी फॅसिलिटीज प्रा.लि.कंपनीचे संचालक दिलीप भरणे यांनी तत्काळ आर्थिक सहाय्य केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन वार्तांकन करण्यासाठी पत्रकार सतत घराबाहेर पडून काम करत असतात. अशा मुळशीतील पत्रकार बांधवांचा कोरोना कवच विमा पत्रकारांच्या प्रयत्नातून काढण्यात आला आहे. या ‘कोरोना कवच’ विम्याचा प्रदान सोहळा पौड येथे तहसिल कार्यालयात पार पडला. विम्यासाठी हिंजवडी आयटी सिटीतील डी.बी. फॅसिलिटीज प्रा.लि. या खासगी कंपनीने पत्रकारांना सहाय्य केले.

           विमा प्रदान वेळी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, उद्योजक राजेंद्र बांदल, पत्रकार बंडू दातीर, दीपक सोनवणे, रोहिदास धुमाळ, विजय वरखडे, गोरख माझिरे, महेश मांगवडे, संजय दुधाणे, बाळासाहेब कुरपे आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी पत्रकार रोहिदास धुमाळ, विजय वरखडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

पत्रकारांसाठी संरक्षण म्हणून विमा सुरक्षा कवच असायला पाहिजे यासाठी काही पत्रकारांनी सहकार्याबाबत विचारणा केल्यावर, ताबडतोब सर्वोतोपरी मदत करण्यासाठी होकार दिला. कोरोनाच्या विदारक परिस्थितीत देखील आपल्या जीवाची पर्वा न करता दररोज अचूक वार्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून सहकार्य केले आहे. – दिलीप भरणे : संचालक, डी.बी फॅसिलिटीज प्रा.लि. हिंजवडी आयटी सिटी.

    कोरोना महामारीच्या कालावधीत अगदी सुरुवाती पासून मुळशी तालुक्यातील सर्वच उपनगर वार्ताहर आपला जीव धोक्यात घालून गावठाण, वाड्यावस्त्यांवर तसेच विविध शासकीय कार्यालयात उपस्थित राहून दैनंदिन घडामोडी तसेच कोरोना विषयीच्या घडामोडी बातमीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. राज्य शासनाकडून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच कार्यरत असणाऱ्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले, त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा संरक्षण आणि उपचारासाठी कोविड रुग्णालयात विशेष तरतूद देखील करण्यात आली. मात्र दुसरीकडे अशा विदारक परिस्थितीत सुद्धा प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणारे पत्रकार मात्र या सगळ्यांपासून दुर्लक्षित राहिले.

रोहित पवार यांनी व्यावसायाबद्दल मार्गदर्शन करून जिंकली पाटसकरांची मने

सचिन आव्हाड

कोणताही व्यवसाय छोटा – मोठा नसतो , कोणताही व्यवसाय सुरू केल्यानंतर लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नसतो , आपले आई वडील सहमत असतील तर व्यवसाय करायला हरकत नाही .असा मौलिक सल्ला कर्जत – जामखेड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी पाटस गावातील युवकांना दिला .पाटस गावातील शुभम खाडे आणि करण खाडे यांच्या खाडे इलेक्ट्रिकल या दुकानाचा शुभारंभ रोहित पवार यांच्या हस्ते पार पडला . यावेळी रोहित पवार यांनी युवकांशी संवाद साधला .व्यवसाया बाबत मार्गदर्शन करून पाटस परिसरातील युवकांची मने जिंकली .

यावेळी सत्वशील शितोळे, शिवाजी बापू ढमाले ,संपत भागवत, लहू खाडे,सुरज होले,रवी सायकर,आबा गुळवे,नारायण सायकर, जाकीरभाई तांबोळी ,गणेश रंधवे आणि मनोत्रीशा इस्टेट चे मालक राहुल आव्हाड यांसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते .

पुढे बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की , व्यावसाय सुरू करताना धाडस करणे महत्वाचे आहे . अडचणी येत असतात . मात्र या अडचणींवर मात करत पुढे जायचं असत . या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व युवकांनी आदर्श घेऊन व्यावसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .

राज्यातील तरुण कार्यक्षम आमदार रोहित पवार यांची तरुण वर्गात मोठी क्रेझ असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे . पाटस येथे रोहित पवार येणार असल्याची माहिती कळताच मोठ्या संख्येने तरुण जमले होते . रोहित पवार यांच्या सोबत तरुणांनी सेल्फी घेत सोशल मोडियावर सेल्फी व्हायरल केले .

धामणे शाळेत टॅब देऊन शिष्यवृत्ती गुणवंतांचा सन्मान

राजगुरूनगर-धामणे (ता.खेड) प्राथमिक शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट सिटीकडून टॅब देऊन सन्मानित करण्यात आले.

धामणे शाळेमध्ये गेल्यावर्षी सुरु झालेली शिष्यवृत्ती यशाची परंपरा अखंड चालवत यावर्षीही तीन विद्यार्थी गुणवंत ठरले अहेत. या यशाची दखल घेऊन गुणवंतांचा गुणगौरव आणि सद्यस्थितीत ऑनलाइन अभ्यासासाठी पूरक ठरणारे साधारण दिड लाख रुपये किमतीचे २५ टॅब पुणे स्पोर्ट सिटी रोटरी क्लबने दिले.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष मनोजित चौधरी, माजी अध्यक्ष विनोद पाटील, संदेश सावंत, नितीन जोशी यावेळी उपस्थित होते.

धामणे शाळेतील सुमेध रमेश बच्चे, ज्ञानेश्वरी अरुण शिवेकर, देविका सोमनाथ कोळेकर, आकांक्षा विकास कोळेकर व साक्षी तानाजी बारवेकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा टॅब देऊन रोटरियन्सच्या हस्ते प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक अमर केदारी यांचा विशेष सत्कार झाला.


यावेळी प्रा.तानाजी कोळेकर, काळूराम गिर्‍हे, सोपानराव कोळेकर, रमेश बच्चे, पै.सतिश कोळेकर, संभाजी गिर्‍हे, गंगाराम कोळेकर, अनिल बोर्‍हाडे, मारुती जरे, अमर केदारी, मंगल निमसे, उषा कोळेकर, पल्लवी कोळेकर, गणेश काळे, संतोष वाघुले आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी केले.तर आभार मारुती जरे यांनी मानले.

बाबाजी कोरडे यांचा एमडीआरटी पुरस्काराने गौरव

राजगुरूनगर -भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून वाकळवाडी येथील विमा प्रतिनिधी बाबाजी कोरडे यांचा पिंपरी- चिंचवड, पुणे विभागातून विमा (एलआयसी) क्षेत्रातील  जागतिक पातळीवरील मानाचा २०२०-२१ चा एमडीआरटी (अमेरिका) या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

बाबाजी कोरडे यांनी  अनेक गावांना विमा ग्राम पुरस्कार मिळवून देण्यासाठी सहकार्य केले आहे. गेली ५ वर्षे ते हा व्यवसाय करीत आहेत. त्यांना या कामात श्रीकांत टमके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

या पुरस्काराबद्दल बाबाजी कोरडे यांच्यावर वाकळवाडी गावच्या नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे

20,829FansLike
0FollowersFollow
68,396FollowersFollow
0SubscribersSubscribe